BALBHARATI · MH-SSC
CHAPTER 4 · PAGE 28
हवामान आणि हवामानावर परिणाम करणारे घटक
पृथ्वीवरील विशिष्ट प्रदेशात दीर्घ कालावधीत आढळणाऱ्या वातावरणाच्या सरासरी अवस्थेला 'हवामान' असे म्हणतात. हवामानाचा अभ्यास करताना तापमान, पर्जन्य, वारा, आर्द्रता, वायुदाब अशा घटकांचा विचार केला जातो.
[ Fig 4.2 — Diagram: Factors affecting climate of a region ]
हवामानावर परिणाम करणारे घटक:
- अक्षांश (Latitude)
- उंची (Altitude)
- समुद्रापासूनचे अंतर
- वारे आणि सागरी प्रवाह
- पर्वतरांगा व त्यांची दिशा
समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर वाढले की तापमानात फरक पडतो. विषुववृत्तापासून ध्रुवांकडे जाताना तापमान कमी होत जाते…